Wednesday, April 8, 2020

आठवणी .......



आठवणी आयुष्यात खूप काही देवून जातात कधी डोळ्यात अश्रु तर कधी सुखद क्षण. का कोण जाणे पण हे मन पुन्हा पुन्हा त्या काँलेजच्या आठवणीत रमत. आम्ही जेव्हा फस्ट यिअरला होतो तेव्हा नेहमी अस वाटायचं कधी हे चार वर्ष संपायचे देव जाणे पण जसं जसं फाइनल यिअर जवळ आल तसं तसं खूप वाईट वाटत होत आणि पुढे काय करायचं याची चिंताही होती.

 आठवतात त्या फस्ट यिअर मधल्या फ्रेशर पार्टीतल्या गमती. पुढे जाऊन स्वतःची ओळख करून देण्याची भीती तर, कोणीतरी आपल्यावर फिशपोंड टाकेल याची भीती. पण हे फस्ट यिअर मात्र लेक्चर आणि ओळख करून घेण्यातच गेलं. अगदी सहजच हे फस्ट यिअरचे दिवस बघता बघता कसे निघुन गेले कळालच नाही. झालं संपल फस्ट यिअर, म्हणुन थोडस हायस वाटलं.  बॅकलॉक मुळे काही मित्रांची साथ मात्र सुटली.

कधी कधी लेक्चर बोर झाले का मग लेक्चर बंक करून काँलेजच्या लाइब्ररीत जाऊन गप्पा मारत बसणे, तर कधी टेस्टचा अभ्यास झाला नाही म्हणुन लेक्चर बंक करून लाइब्ररीत अभ्यास करत बसणे. मित्रमैत्रिणींचे वाढदिवस साजरे करणे आणि उरलेला केक एकमेकांच्या चेहऱ्याला लावणे बड्डे बॉयला मारणे यात खूप मज्जा यायची. त्यामुळे प्रत्येकाला मरणापेक्षा, बड्डेची जास्त भीती वाटायची. मग हळूहळू सुरु होतात त्या अफेअरच्या गप्पा. काल कुठे होतास ? असे म्हणुन एकमेकांना चिडवणे. आज मी तिला त्याच्यासोबत पाहिलं, आज मी त्याला तिच्यासोबत पहिले. कधी ब्रेकअपच्या ताज्या बातम्या तर कधी एखादी नवीन लव्ह स्टोरी असायची. 

मग येतात ते स्पोर्ट्स चे दिवस पुर्ण क्लासने एकत्र येऊन सिनिअर्सला हरवुन सगळी बक्षिसे आपल्याकडे मिळवणे आणि क्लासची शान वाढवणे. स्पोर्ट्स कुठे संपतात का लगेच येतात ते गॅदरिंगचे दिवस स्वतःमधील कला सादर करण्याचा दिवस आणि तुझा डान्स खूप छान होता मला खूप आवडला अशी कौतुकास्पद ओळख करून घेण्याचा दिवस. पुढे अजून मग त्याच गॅदरिंगच्या गप्पा, मन कुठे रमतय त्या अभ्यासात.

असेच काही सुखद क्षण जातात ना जातात तर येतातच त्या सेमिस्टरच्या परिक्षा आणि मग सुरु व्हायच्या आमच्या नोट्स गोळा करण्याच्या रूढी परंपरा आणि एकमेकांचे जर्नल्स कॉपी पेस्ट करण्याची घाई .बाहेरगावी राहणारे मात्र आपल्या बॅग भरण्याच्या आणि घरी जाण्याच्या तयारीतच असायचे. रिझल्ट लागल्यावर तुला किती रे त्याला किती रे ह्या ऐवजी कोण बॅक राहीलय का ? ह्याचीच जास्त चर्चा असायची. अरॆरॆरॆ खूप वाईट झालं, वाटलं नव्हतं हा कधी फेल होईल ते. असोत असेच हे सारे क्षण खूप काही आठवणी निर्माण करुन गेले. बघता बघता फाइनल यिअर पण संपले आणि सुरु झाल्या त्या खऱ्या आयुष्याच्या वाटचाली.

पण का कोण जाणे हे मन पुन्हा पुन्हा त्या काँलेजच्या आठवणीत का रमत आणि स्वतःला एक प्रश्न का विचारत ती सध्या काय करत असेल ? तो सध्या काय करत असेल ? आणि मग मीच माझं मला समजवते कुठेना कुठे तेही ह्याच आठवणीत रमत असतील. पुन्हा हेच क्षण कधी अनुभवायला भेटतील या आशेवर जगत असतील पण या वेड्या मनाला कोण समजवेल क्षण येतात जातात आणि उरतात त्या फक्त आणि फक्त आठवणी आणि आठवणीतील तो जिवंतपणा .......


Hello Friends,
                       This was the story that I had written when I completed my graduation and I knew that each one of us has lived these precious moments of college life in our graduation time which we never forget and especially when we realize nothing will be the same again. So, I thought I need to share those happy moments with you that will make you smile.

This was my first story that helped me to realize that I can put my feelings, my emotions into words that will help someone to change their attitude towards life. I feel very bless the day when my words will influence people’s minds. So, please share, comment and follow my blog that will help to those people to change their attitude towards life.


Thank you. 

Stay safe and Be happy ......😊😊

13 comments:

A grateful heart is magnet for miracle ......

Not every marriage is going as “Happily ever after married life” either it is arranged marriage or love marriage. Life comes with ful...